YAHOO! इंडिया सेवेच्या अटी

(१) अटींची स्वीकृती
Yahoo! इंडियामध्ये आपले स्वागत आहे. याहू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्रकरणपरत्वे "याहू", "आम्ही" किंवा “आपण”) तुम्हाला सेवा पुरवितात, (ज्यांचे वर्णन खाली केले गेले आहे) ह्या सेवांखालील ‘सेवेच्या अटींच्या’ आधीन आहेत., Yahoo! तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता ह्या सेवेच्या अटींमध्ये बदल करू शकते
सेवेच्या अटींची सर्वात अलिकडची आवृत्ती तुम्ही https://policies.yahoo.com/in/mr/yahoo/terms/utos/index.html येथे कधीही बघू शकता.. याशिवाय, विशिष्ट याहू सेवा वापरताना अथवा तृतीय पक्षाच्या सेवा वापरताना, तुम्ही आणि याहू, ह्या सेवांना लागू असलेल्या व वेळोवेळी प्रकाशित केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अथवा नियमांच्या , आधीन असाल. अशा सर्व वेळोवेळी परिवर्तनीय मार्गदर्शक तत्त्वांचा किंवा नियमांचा, ज्यात बदल होऊ शकतो, सेवेच्या अटींमध्ये संदर्भाने समावेश केला आहे. बहुतांश वेळी ही मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम सेवेच्या एका विशिष्ट भागासंबंधी असतात आणि तुम्हाला या सेवेच्या अटी त्या भागास लागू करण्यात सहायक ठरतात, मात्र सेवेच्या अटी आणि मार्गदर्शक तत्त्व किंवा नियम यात काही विसंगती आढळल्यास, सेवेच्या अटी अंतिम मानल्या जातील. आम्ही भिन्न सेवेच्या अटींनी शासित होणाऱ्या इतर सेवाही वेळोवेळी देऊ शकतो. आम्ही भिन्न सेवेच्या अटींनी शासित होणाऱ्या इतर सेवाही वेळोवेळी उपलब्ध करू शकतो. अशा वेळी ह्या इतर सेवांना खालील सेवेच्या अटी तेवढ्याच प्रमाणात लागू पडणार नाहीत जेवढ्या प्रमाणात त्या भिन्न अटींतून खालील अटी स्पष्टपणे अपवर्जित करण्यात येतील. या सेवेच्या अटी अशा इतर सेवांना लागू होत नाहीत ज्या भिन्न सेवेच्या अटींनी शासित होतात.

(२) सेवेचे वर्णन
याहू आपल्या प्रॉपर्टीजच्या जालव्यहूद्वारे (“सेवा”) वापरकर्त्यांना ऑन-लाईन साधनसंपत्तिचा संग्रह उप्लब्ध करून देत असते, ज्यात विविध संपर्क साधने (कम्यूनिकेशन टूल्स), ऑनलाईन फोरम्स, खरेदीविषयक सेवा, पर्सनलाईज्ड कन्टेन्ट आणि ब्रॅन्डेड प्रोग्रामिंगचा समावेश आहे (“सेवा”). Yahoo च्या स्वेच्छाधिकारानुसार असलेल्या सेवा (किंवा त्यांचा भाग), आता ज्ञात असलेल्या किंवा पुढे विकसित होणाऱ्या विविध माध्यमांद्वारे किंवा उपकरणांद्वारे वापरकर्तांना उपलब्ध असतील किंवा वापरता येतील, ज्यात वर्ल्ड वाईड वेब, मोबाईल टेलिफोन किंवा संपर्क सेवा (उदा. एसएमएस (शॉर्ट मेसेज सेवा)), आणि/किंवा इतर इंटरनेट किंवा दूरसंचार सेवा किंवा प्रोटोकॉल्स (उदा. डब्ल्युएपी (वायरलेस अ‍प्लिकेशन प्रोटोकॉल)) (एकत्रितपणे "वाहिन्या") यांचा समावेश आहे, पण ते त्यापुरतेच मर्यादित नसेल. या सेवांमध्ये Yahoo तर्फे काही संपर्कांचा समावेश असू शकेल हे आपण जाणता आणि सहमत आहात, उदा. सेवा घोषणा, प्रशासकीय संदेश आणि Yahoo न्युजलेटर आणि अशा संपर्कास Yahoo सदस्यत्वाचा भाग मानले जाईल आणि ते प्राप्त न होण्याचा पर्याय तुम्हाला निवडता येणार नाही.

जो पर्यंत वेगळ्याप्रकारे स्पष्टपणे निवेदन केले जात नाही, तो पर्यंत सध्याच्या सेवेत वाढ किंवा सुधारणा करणारे कोणतेही नवीन वैशिष्ट्य, ज्यात नवीन प्रकाशित याहू प्रॉपर्टीजचाही समावेश असेल, ते खालील सेवेच्या अटींच्या अधीन असेल. सदर सेवा ही "जशी आहे" तत्वावर पुरविली जाते आहे आणि वापरकर्त्याच्या संवादाच्या किंवा वैयक्तिक रचनेसंबंधाच्या वक्तशीरतेसाठी, डिलीशन (काढून टाकली जाणे), चुकीची डिलिव्हरी किंवा अशी माहिती साठवण्यास अपयश आल्यास याहू जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही याबरोबर सहमत आहात.

सेवेचा वापर करण्यासाठी, तुम्ही वाहिन्यांमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे वेब-आधारित माहिती उपलब्ध करून देणाऱ्या उपकरणांद्वारे उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या सेवेला उपलब्ध करून देण्याकरता उपयोज्य ते सेवा शुल्क तुम्ही भरणे गरजेचे आहे. असे शुल्क आणि प्रदान अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो, आणि असे बदल तुम्हाला ई-मेल किंवा सूचना किंवा सेवेमध्ये सूचनेची लिंक देऊन किंवा इतर योग्य माध्यमाद्वारे सूचित करण्यात येतील. सेवेचा काही भाग हा केवळ विशिष्ट वाहिन्यांद्वारे उपलब्ध आहे हे तुम्ही स्वीकारता. सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे केलेला प्रवेश आणि कोणत्याही सेवा वाहिन्यांच्या तुमच्या वापरासाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी नाही, हे तुम्ही स्वीकार करता.

याशिवाय, संबंधित वाहिनीसाठी तुम्ही सर्व आवश्यक उपकरणांची तरतूद करणे आवश्यक आहे, ज्यात एक संगणक आणि मोडेम, मोबाईल टेलिफोन किंवा इतर योग्य प्रवेश उपकरणांचा समावेश असेल, आणि संबंधित वाहिन्यांच्या वापरासाठी लागू असणारे शुल्क तुम्ही भरणे आवश्यक आहे. कोणत्याही वाहिनीद्वारे सेवेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इतर उपकरणांच्या सेट-अप, कॉन्फिगरेशन किंवा कम्पॅटीबिलीटी (योग्यतेसाठी) साठी तुम्ही स्वत: जबाबदार असाल याचा तुम्ही स्वीकार करता. जर सेवेच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागातील बदलामुळे तुमच्या हार्डवेअर, सॉफ्ट्वेअर किंवा इतर उपकरणात बदल आवश्यक असल्यास, तुम्ही तो बदल तुमच्या स्वत:च्या खर्चाने करणे आवश्यक आहे. सेवेतील अशा कोणत्याही बदलाबद्दल आम्ही आपल्याला ई-मेल किंवा सूचना किंवा सूचनांच्या लिंक्स द्वारे किंवा इतर योग्य माध्यमाद्वारे आगाऊ माहिती देऊ.

जोपर्यंत वेगळ्याप्रकारे स्पष्टपणे निवेदन केले जात नाही, तोपर्यंत सेवेत नमूद केलेली माहिती किंवा इतर उत्पादनांच्या आणि सेवांच्या संदर्भातील माहिती जी या सेवेचा भाग आहेत, आमच्यातर्फे किंवा संबंधित तृतीय पक्षातर्फे बंधनकारक प्रस्ताव मानली जाणार नाही, मात्र अशी माहिती आपल्याला ऑर्डर करण्यासाठीचे निमंत्रण मानले जाऊ शकते. सेवेचा भाग म्हणून उपलब्ध असलेल्या आमच्या किंवा इतर तृतीय पक्षाच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या करार संपुष्टीत आले/ पूर्ण झाले असे तेव्हाच होईल जेव्हा आम्ही किंवा तृतीय पक्षाने आपली ऑर्डर स्विकारली असेल किंवा आपल्या मागणीनुसार उत्पादनाचा किंवा सेवेचा पुरवठा केला असेल तर .

भारतीय कायद्यानुसार, अश्लील मानलेली माहिती Yahoo! इंडिया साइटवर पूर्णपणे निषिद्ध आहे आणि वापरकर्त्यांना अशी माहिती Yahoo! इंडिया साइटवर प्रकाशित करण्यास मनाई आहे. जरी Yahoo! इंडिया वापरकर्त्यांनी सेवेच्या अटींचा भंग करून प्रकाशित केलेली सर्व अश्लील माहिती लगेच चिकाटीने काढून टाकण्यात सर्व ती खबरदारी घेते, तरी सुध्दा Yahoo! इंडियाला न सापडलेले वापरकर्त्यांद्वारे प्रकाशित केलेले अश्लील साहित्य इतर वापरकर्तांना आढळल्यास अशा अश्लील/ आक्षेपार्ह साहित्याबद्दल याहूला माहिती देण्यासाठी वापरकर्तानी सर्व ते प्रयत्न करावेत.

(३) आपली नोंदणीसंबंधीची दायित्वे
सेवांचा वापर करण्याच्या मोबदल्यात तुम्ही स्वीकारता की तुम्ही:
(a) सेवेच्या नोंदणीपत्रात विचारल्याप्रमाणे (अशी माहिती "नोंदणी सामुग्री" असल्यामुळे) स्वत:बद्दल खरी, अचूक, अद्ययावत आणि संपूर्ण माहिती पुरवा आणि
(b) नोंदणी माहिती खरी, अद्ययावत, अचूक आणि संपूर्ण ठेवण्यासाठी त्यात नियमितपणे सुधारणा कराल. जर तुम्ही एखादी खोटी, चूकीची किंवा जुनी किंवा अपूर्ण माहिती दिली असेल किंवा तुम्ही दिलेली अशी माहिती असत्य, चूकीची, अपूर्ण आहे अशी शंका घेण्यास याहूकडे संयुक्तिक आधार असला तर, याहू ला आपले खाते निलंबित करण्याचा अथवा सेवेचा (किंवा त्यापैकी काही भाग) आताचा किंवा भविष्यातील वापर तुमच्यावर कोणतेही दायित्व न लादता रद्द करण्याचा अधिकार असेल. आम्हाला आमच्या सर्व वापरकर्त्यांच्या विशेषत: मुलांच्या सुरक्षेविषयी आणि गुप्ततेविषयी चिंता वाटते. मात्र, कृपया या सेवेची रचना व्यापक दर्शकांन पसंत पडावी अशी केली आहे हे कृपया लक्षात ठेवावे. त्यानुसार, जर आपण पालक किंवा कायदेशीर पालनकर्ता असाल तर सेवा आणि/ किंवा माहिती (खालील विभाग 6 मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे) तुमच्या बालकासाठी योग्य आहे का हे ठरविण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही बालक असाल तर कृपया आपल्या पालकांशी किंवा कायदेशीर पालनकर्ताशी सेवा किंवा त्यातील माहिती तुमच्यासाठी योग्य आहे का याबद्दल सल्ला मसलत करा.

असे असून सुद्धा, आम्ही आपल्याला काही सेवा वापरण्यासाठी उपभोक्ता म्हणून तुमच्या नोंदणी शिवाय उपलब्ध करून देऊ शकतो. अशा वेळी, तुमची ओळख ही, आम्हाला योग्य वाटणाऱ्या तुमच्या इतर ओळखीच्या साधनांवर आधारित असेल. योग्य त्या प्रसंगी, तुमची ओळख ही तुमचा मोबाईल टेलीफोन किंवा तुमच्या नेटवर्क चालकाने दिलेल्या संपर्क वर्गणी क्रमांकावर आधारित असेल. सेवेच्या अटींनुसार अशी माहिती आमच्यातर्फे गोळा करण्यास व आमच्याजवळ उघड करण्यास त्याचबरोबर ह्या माहितीच्या सेवेच्या अटींनुसार वापर करण्यास आपली सहमती आहे.

(४) YAHOO चे गुप्तता धोरण
रजिस्ट्रेशन डेटा (नोंदणी माहिती) आणि तुमच्या बद्द्लची इतर विशिष्ट माहिती ही आमच्या प्रायव्हसी पॉलीसीच्या/गुप्तता धोरणाच्या आधीन आहे. आमच्या गुप्तता धोरणाचा सेवेच्या अटींमध्ये संदर्भाने समावेश केला असल्याने आमचे गुप्तता धोरण सेवेच्या अटींचा भाग आहे. अमलाखाली येते आणि सेवेच्या अटींचा एक घटक म्हणून एकत्रित केली जाऊ शकते. रजिस्ट्रेशन डेटा आणि तुमच्या विषयी माहिती आम्हाला दिल्यावर किंवा उपलब्ध करून दिल्यावर, तुम्ही हे मान्य करता आणि स्वीकारता की कदाचित आम्ही गुप्तता धोरणात नमूद केल्या प्रमाणे तुमची माहिती वापरू किंवा तिसऱ्या व्यक्तिला देऊ आणि अशा प्रकारे माहिती वापरास आणि उघड करण्यास परवानगी तुम्ही आम्हाला देत आहात. अधिक माहितीसाठी आमचे संपूर्ण गुप्तता धोरण https://policies.yahoo.com/in/en/yahoo/privacy/index.htm या संकेत स्थळावर वाचा. तुम्ही हे जाणता की तुमच्या सेवेच्या वापराद्वारे तुम्ही या माहितीच्या संग्रह आणि वापरास (गुप्तता धोरणात सांगितल्याप्रमाणे) अनुमती देत आहात, ज्यात या माहितीचे अमेरिकेत आणि/किंवा इतर देशात Yahoo अथवा Yahoo च्या संबंधित कंपनींनी संचय, प्रक्रिया व वापर करण्याकरता स्थानांतरण करणे ह्या अनुमतीचा समावेश आहे.

(५) सदस्य खाते, पासवर्ड आणि सुरक्षितता
सेवेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला पासवर्ड आणि खाते अभिधान दिले जाईल. तुमच्या खात्याची व खात्याच्या पासवर्डची गोपनीयता सांभाळण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे. तसेच तुमच्या पासवर्ड आणि खात्याअंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यांसाठीही तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात तुम्ही मान्य करता की, (a) अनधीकृतपणे तुमचा पासवर्ड किंवा खाते/अकाउंट वापर केला गेल्यास किंवा त्यासंबधीत इतर सुरक्षिततेचा भंग केला गेल्यास तुम्ही Yahoo ला त्वरित कळवाल आणि (b) प्रत्येक सेशनच्या शेवटी तुम्ही तुमचे अकाउंट नीट बंद कराल. या विभाग 5 प्रमाणे जर तुम्ही पालन केले नाही तर, याहू कुठल्याही नुकसान किंवा हानी साठी जबाबदार रहाणार नाही.

(६) सभासदांचे आचरण
तुम्ही हे जाणता व स्वीकारता की जाहीर किंवा खाजगीरित्या प्रसारित केलेली सगळी माहिती, डेटा, मजकूर, सॉफ्टवेअर, संगित, आवाज, फोटो, ग्राफिक्स, विडीयो, संदेश, किंवा इतर मटेरिअल (मजकूर) याची जबाबदारी संपूर्णपणे त्या व्यक्तीची असेल ज्या व्यक्तीने या मजकूराचा प्रसार करण्याचा प्रारंभ केला. याचा अर्थ असा आहे की तुमच्या पोस्ट, अपलोड, ईमेल किंवा सेवे मार्फत प्रसारणा केलेल्या मजकुरासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात, Yahoo नाही

सेवे मार्फत मजकूर प्रकाशित झाल्यास Yahoo त्याच्या वर नियंत्रणं ठेवत नाही किंवा मजकूराच्या अचूकतेची, प्रामाणिकतेची किंवा दर्जाची हमी देत नाही. सेवेचा वापर करताना, तुम्हाला , अपमानकारक, अनुचित, असभ्य किंवा निषेधार्ह मजकूर बघावयास लागू शकतो. कुठल्याही परिस्थितीत आम्ही किंवा आमचे लायसन्स धारक, पुरवठाकार, विक्रेते, पैरेंट, धारक, गौण किंवा संलग्न कंपन्या, अधिकारी, एजंट किंवा कर्मचारी कुठल्याही प्रकारे मजकूरासाठी जबाबदार नाहीत तसेच पण, कुठल्याही , अपमानकारक, असभ्य किंवा निषेधार्ह मजकूरासाठी किंवा प्रसारीत केलेल्या महिती मधील चूक/ वगळणे यासाठी किंवा प्रसारित केलेल्या माहितीचा वापर किंवा पाठविलेल्या ईमेल अथवा एखादया सेवेद्वारे पाठविलेल्या माहितीमुळे झालेल्या नुकसानासाठी Yahoo व वरील मंडळी जबाबदार नाही, मात्र हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही .

तुम्ही मान्य करता की सेवेचा वापर तुम्ही खालील कारणांसाठी करणार नाही:

a. कोणताही मजकूर अपलोड, पोस्ट, ईमेल किंवा प्रसारित करणे जो बेकायदेशीर, अपायकारक, धमकावणारा, शिवीयुक्त, छळवणूक करणारा, टोर्शीयस बदनामीकारक, अश्लील, बीभत्स, अब्रुनुकसानीकारक, इतरांच्या खाजगी आयुष्यात घृणास्पद, वांशिकदृष्ट्या, मानववंशिकदृष्ट्या,किंवा इतर प्रकारे निषेधार्ह किंवा जनतेच्या आवडीच्या परस्परविरोधी, जनादेश हितसंबंधाविरूध्द किंवा सुव्यवस्था राष्ट्रीय ऐकीचा भंग करण्यासाठी वापरणे
b. अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारे त्रास देणे.
c. इंपर्सोनेट, स्वत:ची खोटी माहिती देणे, कोणत्याही व्यक्तीशी संबंध असल्याचे खोटे सांगणे, भासवणे, ज्यात Yahoo चे अधिकारी, फोरम लीडर, मार्गदर्शक किंवा होस्ट यांचा समावेश होतो मात्र हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही.
d. बनावट हेडर तयार करणे किंवा फेरफार करणे किंवा कोणत्याही प्रकारे फसवण्याचा प्रयत्न किंवा/आणि सेवे मार्फत पाठवलेल्या माहितीचा स्रोत लपविण्यासाठी ओळख माहितीमध्ये फेरफार करणे.
e. कोणताही मजकूर अपलोड, पोस्ट, ईमेल किंवा मजकूर प्रसारित करणे ज्याच्या प्रसारणाचा तुम्हाला कुठल्याही कायद्याच्या किंवा कराराच्या किंवा प्रत्ययी संबंधानुसार कुठल्याही प्रकारचा हक्क नाही. (जसे की गोपनीय महिती, मालकी, अथवा व्यावसायिक संबंधांमुळे माहीत झालेली किंवा नॉन डिस्क्लोजर करारानुसार माहीत झालेली गोपनीय माहिती उघड करणे);
f. कुठलाही मजकूर अपलोड,पोस्ट किंवा ईमेल किंवा इतर प्रकारे प्रसार करणे जेणेकरून कोणत्याही पक्षाच्या पेटंट, ट्रेडमार्क, कोपीराइट िव्यावसायिक गुपित किंवा इतर मालकी हक्कांचे उलंघन होईल.
g. कुठल्याही अपलोड, पोस्ट, इमेल किंवा इतर प्रसाराने कोणतीही न मागीतलेली किंवा अनाधीकृत जाहीरात करणे, पोस्ट, जंक-ईमेल, स्पॅम, पिरॅमिड स्कीम, चेन-लेटर्ज किंवा कुठल्याही प्रकारची विनवणी करणे (जसे शॉपिंग रूम पण येथपर्यंत सीमित नाही) मात्र ज्यांची नेमणूक अशा प्रकारचे काम करण्यास केली आहे ते वगळून.
h. कोणतेही सॉफ्टवेअर व्हायरस किंवा संगणकीय गुप्त लिपी /कोड, फाइल किंवा प्रोग्राम असलेले साहित्य जे संगणकाच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर किंवा दूरसंचार साधनात हस्तक्षेप करते, नष्ट किंवा बिघाड करतात असे काहीही अपलोड, पोस्ट, इमेल किंवा इतर प्रकारे उपलब्ध किंवा प्रसारित करणे.
i. संभाषणाच्या नैसर्गीक गतीमधे व्यत्यय आणणे, इतर वापरकर्ते टाईप करु शकणार नाहीत इतके जलदपणे स्क्रीनला स्क्रॉल करणे किंवा असे वागणे जेणे करुन इतर वापरकर्त्यांच्या माहीतीची अदलाबदल करतांना किंवा "आहे अशा" स्थितित आम्ही पुरवलेल्या वापरकरण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होईल.
j. सेवेत व्यत्यय आणणे किंवा ढवळाढवळ करणे किंवा सेवेशी संबंधित नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणे, सेवेशी संबंधित आवश्यकता, प्रक्रिया, धोरणे किंवा नियमावलींचे उलंघन करणे.
k. लागू असलेल्या कोणत्याही स्थानिक, राज्यातील, राष्ट्रिय किंवा आंतरराष्ट्रिय कायद्याचे कळत किंवा नकळत उल्लंघन करणे ज्यामध्ये भारतीय प्रतिभूति व, देवाणघेवाण नियंत्रण, आणि इतर नियामक अधिकारी ह्यांचे नियम व, भारतीय प्रतिभूति व देवाणघेवाण यंत्रणा आणि कायद्याशी निगडीत कुठलेही नियम समाविष्ट असतील परंतु ते केवळ यापर्यंतच मर्यादित नसतील
l. इतरांचा इंटरनेटवर पाठलाग करणे किंवा त्यांना त्रास देणे.
m. एखादी फसवी वा बेकायदेशीर कृती करणे जी याहूच्या सेवांच्या माध्यमातून सेवा प्रदान करणाऱ्या विक्रेत्याशी संबंधीत आहे किंवा नाही.
n. अटी व कृतींसाठी नमुद केलेल्या विभाग a. ते m प्रमाणे इतर वापरकर्ते यांची माहिती गोळा करणे किंवा साठवणे.

तुम्ही मान्य करता की Yahoo! कुठल्याही मजकूराची छाननी आधी करु शकत नाही आणि करत नाही, पण Yahoo व आम्ही नियोजित केलेल्या व्यक्ती/ कंपनीनी सेवेमार्फत आढळळेला मजकूर नाकारण्याचा किंवा काढून टाकण्याचा हक्क आमच्या सर्वाधिकारात आहे. Yahoo आणि Yahoo! ने नियोजित केलेल्या व्यक्ती/कंपनींनी सेवेमार्फत आढळळेला मजकूर जो आमच्या मते सेवेच्या अटींचे उलंघन करतो किंवा जो बौध्दिक संपदेचे उल्लंघन करतो किंवा जो आमच्या निर्णयानुसार आक्षेपार्ह आहे, तो मजकूर काडून टाकला जाईल व त्या काढून टाकलेल्या मजकूरामुळे होणाऱ्या नुकसान किंवा तोट्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. तुम्ही मान्य करता की तुम्ही मजकूर वापरण्यामधील जोखमीचे परीक्षण कराल व ती स्वीकाराल ज्यामध्ये मजकूराच्या अचूकतेवर अवलंबन, मजकूराची संपूर्णता, किंवा उपयुक्तता ह्यांचा समावेश आहे. ह्यासंदर्भात, तुम्ही कबूल करता की Yahoo नी तयार केलेल्या सादर केलेल्या मजकूरावर तुम्ही अवलंबून राहणार नाही ज्यात Yahoo! मेसेज बोर्ड, Yahoo! ग्रुप आणि सेवेच्या अन्य भागांमधे उपलब्ध असलेल्या माहितीचा समावेश आहे, मात्र हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही.

तुम्ही कबूल करता की Yahoo मजकूर जपून ठेवेल आणि आवश्यकता असल्यास उघड करेल मात्र ही आवश्यकता कायद्यानुसार असेल किंवा आमच्या विश्वासानुसार असे मजकुराचे संरक्षण किंवा प्रकटन करणे खालील कारणांसाठी गरजेचे असेल:

(a) कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे;
(b) . सेवेच्या अटी आमलात आणणे;
(c) कुठल्याही मजकूरामुळे तृतीय पक्षाच्या हक्कांचे उलंघन होत आहे अशा दाव्याला प्रतिसाद देताना;
(d) ग्राहक सेवेसाठी आलेल्या आपल्या विनंतीला प्रतिसाद देणे; किंवा
(e) Yahoo, त्याचे वापरकर्ते आणि लोक यांचे हक्क, मालमत्ता, किंवा वैयक्तिक सुरक्षेचे रक्षण करणे;

तुम्ही हे जाणता की, सेवेचे तांत्रिक संस्करण (प्रोसेसिंग) आणि प्रसारण, ज्या मध्ये तुमच्या मजकूराचा समावेश आहे, यामध्ये खालील बाबींचा अंतर्भाव होऊ शकतो
(a) विविध नेटवर्क वर प्रक्षेपण; आणि.
(b) कनेक्टिंग नेटवर्कच्या किंवा उपकरणांच्या तांत्रिक गरजांचे अनुकूलन करणे किंवा त्यांच्या अनुसार बदल करणे.

जेथे सेवेचा कुठल्याही भागामध्ये तृतीय पक्षाशी समायोजन आहे किंवा त्रयस्थ पक्षाशी समायोजनेद्वारे सेवेचा तो भाग आम्ही पुरविला आहे, अशा ठिकाणी कुठल्याही सूचने शिवाय तुम्ही अशा सेवेच्या भागाशी संबंधित तृतीय पक्षाने दिलेल्या सूचना किंवा मार्गदर्शक तत्त्वे किंवा निदेश पाळण्याची सहमती देता ज्यात तुमचा सेवेत प्रवेश व सेवेचा वापरही समाविष्ट आहे.

(७)YAHOO! च्या नेटवर्कवर आंतरराज्य स्वरूपाचे संपर्क जेव्हा तुम्ही Yahoo! वर नोंदणी करता तेव्हा तुम्ही या गोष्टींचा स्वीकार करता की इलेक्ट्रॉनिक संवादासाठी (ज्यात ईमेल, शोध, Yahoo! चॅट किंवा Yahoo! ग्रुप ला मेसेज पाठवणे, फोटो आणि फाइल Yahoo! फोटो किंवा ब्रीफकेस Yahoo! वर सांक्रमित/अपलोड करणॆ आणि इतर इंटरनेटचे उपक्रम हे समाविष्ट आहे मात्र हे एवढ्यापुरते मर्यादित नाही), Yahoo! च्या सेवेचा तुम्ही वापर करताना, Yahoo!'s च्या संगणकीय नेटवर्क च्या तर्फे संवाद पाठवला जाईल, त्यातील काही भाग परदेशात असण्याची शक्यता आहे. परिणामी आणि Yahoo's ची नेटवर्क संरचना व व्यावसायिक सवयींमुळे व ईलेक्ट्रॉनिक संवादाच्या स्वरुपामुळे संवाद जे राज्यांतर्गत स्वरुपाचे दिसतात ते आंतरराज्य संवाद असू शकतात, जरी तुम्ही संवादाच्या वेळी प्रत्यक्ष कोठेही असलात तरी. . त्यामुळे ह्या सेवेच्या अटींना मान्य केल्याने तुम्ही मान्य करता की ह्या सेवेच्या वापराने माहितीचे आंतरराज्यीय प्रक्षेपण होते.

Yahoo मेसेंजर मुळे, ज्यात त्याच्या वेब-आधारित सर्व आवृत्त्यांचा समावेश होतो, तुम्ही आणि तुमच्या संवाद साधणाऱ्या त्या लोकांना आपले संभाषण Yahoo च्या आपापल्या अकाऊंट मध्ये सेव्ह करता येते जे Yahoo सरव्हर वर स्थित आहे. याचा अर्थ की तुम्ही तुमची मेसेज हिस्ट्री इंटरनेट जोडणी असलेल्या कुठल्याही संगणका मधून बघू शकता व सर्च करू शकता.

तुम्ही या फीचरचा वापर करा किंवा नका करू, पण इतर वापरकर्ते याचा वापर करू शकतता आणि कदाचित तुमचे आणि त्यांचे संभाषण त्यांच्या Yahoo अकाऊंट मध्ये सुद्धा सेव्ह करू शकतात. आपली या कराराशी संमती ही Yahoo ला तुमचे संवाद Yahoo सर्व्हर वर साठवण्यास करण्यास संमती देते. Yahoo च्या मेसेंजर सेवे मार्फत Yahoo तुम्हाला वेळोवेळी मेसेज पाठवून Yahooच्या मेसेंजर सेवे मधील किंवा संलग्न सेवे मधील महत्तवाच्या बदलांच्या सूचना पाठवेल. तुम्ही सेवेचा वापर जर का अनाधिकृत पणे केला आणि सेवेच्या अटींचा भंग करुन सेवेचा लाभ घेतलात तर तुम्हाला हे मेसेजेस येणार नाहीत. या सेवेंच्या अटींमध्ये तुमची ही स्वीकृती अंतर्भूत आहे की सेवेचा वापर अधिकृत पणे केल्यास तुम्हाला ज्या सगळ्या सूचना प्राप्त झाल्या असत्या तशा तुम्हाला प्राप्त झाल्या आहेत.

(८)आंतरराष्ट्रीय ळाऩर आणि आयात ननयाात अनुऩाऱनाबाबत वळऴेव शूचना
इंटरनेटचे जागनतक स्ळरूऩ ऱसात घेता, अॉ नऱाइन आचरि आणि ग्राह्य आऴय तशेच शंबंधधत माध्यमांच्या ळाऩराबाबत शळा स्थाननक ननयम तुम्षाऱा मान्य आषेत. शेळा आणि षस्तांतर शोयीचा उऩयोग (शर्व्षीश अॅन्ड रान्शफ्रर), श फ्टळेअरचे ऩोस्टींग आणि अऩऱोडींग (कायाक्रमशामग्री नेटळर शंक्रममत करिे), तंत्रहान आणि शेळेद्ळारे ममलिारी इतर तांत्रत्रक माहषती, या शळांना युनायटेदड स्टेटश तशेच इतर देऴातीऱ आयात ननयाात ननयम ळ कायदे ऱागू षोतात. तुम्षाऱा आयात ननयाातीचे शळा ननयम ळ अटी मान्य आषेत, ज्यामध्ये कोित्याषी ननबंधामऴळाय (एक्शऩोटा अॅडममनीस्रेऴन रेग्युऱेऴन्श) ननयाात प्रऴाशन ननयमांचे ऩाऱन ऩषा (शंकऴन कंरोऱ प्रोग्रॅम) ऩषा यांचा शमाळेऴ षोतो. वळऴेवत: तुम्षी प्रनतननधीत्ळ करता आणि खात्री देता की, अ) शरकारी ननयाात ननबंध अशऱेल्या कोित्याषी यादीत तुमचे नाळ नाषी ऩषा ककंळा आयात ननयाात ननयम आणि अटी ऱागू अशल्याचे जाषीर झाऱेल्या देऴाचे तुम्षी शदस्य नाषी;

ब) या शेळेद्ळारे तुम्षी श फ्टळेअर, तंत्रहान आणि इतर तांत्रत्रक माहषती, आयात ननयाात ननबंध अशऱेल्या देऴाकडे ककंळा गटाकडे षस्तांतरीत करिार नाषी;
क) तुम्षी षी शेळा अमेररकन ननयाात कायद्यांचे उल्ऱंघन करण्याशाठी तशेच ऱष्ट्कर, आण्ण्ळक, सेऩिास्त्र, राशायननक, जैवळक ऴस्त्रास्त्रे ननमााि करण्याशाठी करिार नाषी; आणि
ड) या शेळेद्ळारे अमेररका ककंळा इतर कोित्याषी आयात ननयाात कायद्यांचे उल्ऱंघन षोईऱ अशे कोितेषी श फ्टळेअर, तंत्रहान ककंळा इतर तांत्रत्रक माहषती तुम्षी षस्तांतरीत, अऩऱोड ककंळा ऩोस्ट करिार नाषी.

(९) सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी सादर केलेला किंवा उपलब्ध करून दिलेला मजकूर
प्रस्तुत किंवा सेवेमधे समाविष्ट करून घेण्यासाठी सादर किंवा उपलब्ध केलेल्या मजकुराशी YAHOO! मालकी हक्काचा दावा करत नाही. मात्र, तुम्ही YAHOO च्या सेवेच्या सार्वजनिक प्रवेश क्षेत्रात तुमचा मजकूर समाविष्ट करून देण्यासाठी प्रस्तुत किंवा उपलब्ध करून दिला असेल, तर तुम्ही Yahoo खाली दिलेल्या गोष्टींची परवानगी जगभरात, रॉयल्टीमुक्त आणि अवर्जकरित्या देता:

• Yahoo Groupsच्या सार्वजिनक प्रवेश क्षेत्रात समाविष्ट करून देण्यासाठी प्रस्तुत किंवा उपलब्ध करून दिलेल्या मजकूराच्या संदर्भात, ज्यात असा मजकूर प्रस्तुत किंवा उपलब्ध करून दिला गेला आहे असे विशिष्ठ Yahoo Group उपलब्ध करून देण्याच्या किंवा प्रोत्साहन देण्याच्या एकमेव हेतूने, मजकुराच्या वापरासाठी, वितरणासाठी, पुनर्निर्मितीसाठी, सुधारणा, अनुकुलन, आणि मजकुराचे सार्वजनिक प्रदर्शन आणि सार्वजनिक सादरीकरण यासाठीचा परवाना. हा परवाना जोपर्यंत तुम्ही असा मजकूर सेवेमधे समाविष्ठ करत रहाल तोपर्यंतच अस्तित्वात राहिल आणि जेव्हा तुम्ही किंवा Yahoo ाअसा मजकूर सेवेतून काढून टाकेल त्याक्षणी हा परवाना रद्द हॊईल.

• जेव्हा तुम्ही Yahoo Groups सोडून इतर सेवेच्या सार्वजनिक प्रवेश क्षेत्रात फोटॊ, ग्राफिक्स, ऑडीयो किंवा विडीयो ह्या व्यतिरिक्त कोणताही मजकूर प्रस्तुत किंवा समाविष्ट करता ह्या मजकुराच्या वापरासाठी, वितरणासाठी, पुनर्निर्मितीसाठी, सुधारणा, अनुकुलन, प्रसिद्धी, भाषांतर, आणि मजकुराचे सार्वजनिक प्रदर्शन आणि सार्वजनिक सादरीकरण (पूर्ण किंवा काही भाग) आणि असा मजकूर अन्य ठिकाणी आत्ता माहीत असलेल्या किंवा नंतर विकसित झालेल्या माध्यमांद्वारे समाविष्ट करण्यासाठीचा निरंतर, बंधक आणि पूर्णपणे उप-परवाना प्राप्त होण्याजोगता परवाना.

(१०) YAHOO! साठी योगदान
Yahoo! ला त्यांच्या सूचनांद्वारा किंवा प्रतिसाद वेबपेजसच्या माध्यमातून कल्पना, सूचना, दस्तऐवज, आणि/किंवा प्रस्ताव("योगदान") प्रस्तुत करून आपण स्वीकार करता आणि सहमत आहात की: (a) तुमच्या योगदानामधे गोपनीय किंवा वैयक्तिक / मालमत्ता माहितीचा समावेश नाही; (b) या योगदानांच्या संदर्भात Yahoo!वर गोपनीयतेच्या कोणत्याही, व्यक्त किंवा अंतर्भूत दायित्त्वाचे बंधन नाही (c) कोणत्याही हेतूने, मार्गाने किंवा जगभरातील कोणत्याही माध्यमाने अशी योगदाने वापरण्याचे किंवा उघड (किंवा वापरू किंवा उघड करू नये असे निवडण्यासाठी) करण्याचे Yahoo! ला हक्क आहेत. (d) Yahoo! कडे या योगदाशी जुळणारे काही योगदान आधीच विचाराधीन किंवा विकसनशील अवस्थेत असू शकते.(e) तुमच्याप्रति याहूच्या कोणत्याही दायित्त्वाशिवाय तुमचे योगदान आपोआप Yahoo! ची संपत्ती हॊईल. (f) कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रकारे Yahoo! कडून कसलीही भरपाई किंवा प्रतिपूर्ती मिळण्याचा तुम्हाला हक्क असणार नाही.

(११) नुकसान भरपाई
तुम्ही सेवेच्या माध्यमातून प्रस्तुत, पोस्ट किंवा प्रसारित किंवा उपलब्ध केलेल्या मजकुरामुळे, सेवेचा तुमचा वापर, सेवेशी तुमचा संबंध, कोणत्याही चॅनल्सचा तुमचा वापर, TOS चे उल्लंघन, किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही हक्कचे उल्लंघन, किंवा लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन यामुळे निर्माण झालेल्या तृतीय पक्षाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दाव्यापासून आणि मागण्यांपासून ज्यात कायदेशीर शुल्काचा अंतर्भाव होतो, त्यांपासून Yahoo आणि आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेता, पालक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपनीज, सहयोगी कंपन्या, अधिकारी, दलाल, को-ब्रॅन्डर्स किंवा इतर भागीदार, आणि कर्मचारी यांना झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्ही करून द्याल, असे तुम्ही मान्य करता.

(१२) सेवेची पुनर्विक्री नाही
तुम्ही सेवेचा कोणताही भाग, सेवेचा वापर किंवा सेवेचा उपयोग पुनर्निर्मिती, प्रतिकृती, कॉपी, विक्री, पुनर्विक्री किंवा उपभोग घेण्याच्या कोणत्याही व्यवसायिक हेतूने करणार नाही हे तुम्ही मान्य केले आहे.

(१३) वापर आणि संग्रह यांच्याविषयी सामान्य नियम
तुम्ही मान्य करता की , Yahoo त्याच्या निर्णयाधिकारात सेवेच्या वापराबाबत असणारे सामान्य नियम व मर्यादा यांची स्थापना करू शकते, ज्यामधे इमेल संदेश, मेसेज बोर्ड पोस्टींग किंवा इतर अपलोड केलेले मजकूर, सेवेद्वारे कमाल दिवसांकरता राखले जाणे, सेवेच्या माध्यमातून एखाद्या खात्याकडून पाठवले अथवा प्राप्त झाले किंवा सेवेच्या माध्यमातून प्रसारित झालेले संदेश इमेल संदेशांची कमाल संख्या एखाद्या खात्यातून पाठवले अथवा प्राप्त झालेल्या इमेल संदेशांचा किंवा इतर संदेशांचा कमाल आकार तुमच्या वतीने याहूच्या सर्व्हरवर देऊ केली जाणारी अधिकतम डिस्क जागा, आणि दिलेल्या कालावधीत तुम्ही सेवेचा उपयोग करू शकणाऱ्या कमाल वेळा (आणि ज्या कमाल कालावधीसाठी) यांचा समावेश आहे. विशेष वरील मजकूर मर्यादित न करता ही सेवा वापरल्याने तुम्ही , https://policies.yahoo.com/in/en/yahoo/privacy/index.htm येथील तुमच्या सेवेच्या संदर्भात आमच्या नियमांना स्वीकॄती देता आहात तुम्ही हे मान्य करता की, सेवेद्वारे प्रसारित केलेले किंवा साठवलेले कोणतेही संदेश आणि अन्य संभाषण किंवा अन्य मजकूर संचित न झाल्यास किंवा डिलिट झाल्यास Yahoo ची कोणतीही जबाबदारी किंवा दायित्त्व नाही. वेळॆच्या विस्तारित अवधी नंतर खाते निष्क्रिय राहिल्यास, ते लॉग ऑफ करण्याचे हक्क Yahoo ला आहेत असे तुम्ही मान्य केले आहे. कोणत्याही वेळी या सामान्य नियमांमध्ये आणि मर्यादांमधे, सूचना देऊन अथवा सूचना न देता बदल किंवा फेरफार करण्याचे निर्णयाधिकारत हक्क Yahoo ला आहेत असे तुम्ही मान्य करता आणि असा बदल/फेरफार केल्यानंतर सेवेचा वापर तुम्ही चालू ठेवल्यास बदललेल्या सामान्य नियम आणि मर्यादा यांची स्वीकृती आणि तुमच्यावरील बंधकत्त्व. तुम्ही स्विकारले आहे असे मानले जाईल.

(१४) सेवेतील बदलसेवेमधे (किंवा सेवेच्या कोणत्याही भागात) सूचना देऊन अथवा सूचना न देता, तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपाने, कोणत्याही कारणास्तव, सामान्यपणॆ किंवा केवळ तुमच्यासाठी मर्यादित, कोणत्याही वेळी आणि वेळोवेळी बदल करण्याचे किंवा बंद करण्याचे, अधिकार Yahoo ला आहेत हे तुम्ही मान्य करता. तुम्ही मान्य करता की सेवेतील बदल, निलंबन किंवा खंड यासाठी, Yahoo तुमच्याप्रती किंवा तृतीय पक्षाप्रती कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

(१५) सेवेचे खंडन

तुम्ही मान्य केले आहे कि, Yahoo आपल्या निर्णयाधिकारात, तुमचा पासवर्ड, खाते (किंवा त्याचा काही भाग) किंवा सेवेचा वापर बंद करू शकतो, आणि कोणत्याही कारणास्तव सेवेमधे असलेले कोणतेही घटक, कोणत्याही कारणास्तव काढून किंवा नष्ट करून टाकू शकतो, ज्या कारणांमध्ये वापर नसणे किंवा जर Yahooच्या एकमताने , तुम्ही सेवेच्या अटींमधील मुद्द्यांचे किंवा त्यात अपेक्षित भावनेचे उल्लंघन केले आहे किंवा तुम्ही बौद्धीक संपत्तीच्या हक्कांचे वारंवार उल्लंघक करत आहात, अशा कारणांचा समावेश आहे मात्र हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. Yahoo त्याच्या निर्णयाधिकारात आणि कोणत्याही वेळी सेवा किंवा सेवेचा काही भाग, सूचना देऊन किंवा सूचना न देता, काही निवडक किंवा सर्व चॅनल्ससाठी थांबवू शकते. या सेवेच्या अटींच्या तरतुदींच्या अंतर्गत तुमचा सेवेचा उपयोग पूर्वसूचना, आम्ही शिवाय बंद होऊ शकतो हे तुम्ही मान्य करता आणि Yahoo तुमचे खाते आणि त्यासंबंधीत सर्व माहिती व फाईल्स तात्काळ अक्षम किंवा नष्ट करू शकते आणि/किंवा अशा फाईल्स किंवा सेवेच्या पुढील उपयोगावर बंदी आणू शकते हे तुम्ही मान्य करता. याखेरीज, सेवेच्या तुमच्या वापरावरील बंदीबाबत, तुमच्या प्रति किंवा कोणत्याही तृतीय पक्षाप्रति Yahoo उत्तरदायी असणार नाही हे तुम्ही मान्य करता.

(१६) तृतीय पक्षासोबत व्यवहार
या सेवेमधे उत्पादनांचा उपयोग आणि स्वतंत्र तृतीय पक्षांच्या सेवा, प्रत्यक्षपणॆ किंवा अशा तृतीय पक्षांकडून संचलित करण्यात येणाऱ्या साईट्सच्या लींक्स यांचा समावेश असू शकतो. जेथे तृतीय पक्षांची उत्पादने आणि सेवा, सेवेचा काही भाग असतील, तेथे या सेवा आणि उत्पादने तृतीय पक्षांकडुन उपलब्ध करून देण्यात आले आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु त्यासाठी आम्ही बांधील नाही. या सर्व केसमधे, तुमचा पत्रव्यवहार किंवा व्यवसाय सौदा, किंवा सेवेद्वारा प्राप्त इतर पक्षांच्या (ज्यात उत्पादनाचे आणि सेवेचे पुरवठादार, जाहिरातदार आणि सेवेचे इतर वापरकर्ते यांचा समावेश होतो मात्र हे एवढ्यापुरते मर्यादित नाही), प्रसिद्धीमधे तुमचा सहभाग, माल किंवा सेवा यांच्याशी संबंधीत पेमेंट किंवा वितरण आणि इतर कोणत्याही शर्ती, अटी, अशा सौद्यांसोबत असलेले हमी हे केवळ,तुमच्यात आणि अशा तृतीय पक्षांमधे असेल, जरी ते कोणत्याही आमच्या सह-ब्रॅन्डेड उत्पादने किंवा सेवांशी संबंधात किंवा आमच्या ट्रेडमार्क्सचा समावेश असू शकतो. कोणत्याही तृतीय पक्षासोबत केलेल्या अशा प्रकारच्या तुमच्या व्यवहाराने, या तृतीय पक्षांच्या सेवेमधील उपस्थितीमुळे, किंवा या तृतीय पक्षांच्या सेवेच्या वापराने झालेला कोणताही तोटा किंवा हानी, यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही हे तुम्ही मान्य करता.

(१७) लिंक्स
ही सेवा किंवा तृतीय पक्ष इतर वल्ड वाईड वेबकिंवा इतर इलेक्ट्रॉनिक साईट्स किंवा स्रोत पुरवू शकतात. Yahoo चे अशा साईट्स किंवा स्रोतांवर नियंत्रण नाही हे तुम्ही स्वीकारता. अशा बाहेरील साईट्स किंवा स्त्रोतांच्या उपलब्धतेसाठी Yahoo जबाबदार नाही आणि, यातील मजकूर, जाहीरीती, उत्पादने, किंवा अशा साईट्सवर किंवा स्त्रोतांवर उपलब्ध असणारे इतर सामग्री याचे समर्थन Yahoo करत नाही किंवा यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी नाही हे तुम्ही मान्य करता. यानंतर तुम्ही असेही मान्य करता की, कोणत्याही प्रकारे, अशा साईट्स किंवा स्त्रोतांवर असलेल्या अशा कोणत्याही मजकुराचा, मालाचा किंवा उपलब्ध सेवांच्या उपयोगाने किंवा त्यावर अवलंबून राहिल्याने किंवा त्यासंबंधाने कोणतेही नुकसान किंवा तोटा झाल्यास यासाठी Yahoo कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही हे तुम्ही मान्य करता व स्विकारता.

(१८) YAHOO चे प्रोप्रायटरी (स्वामित्त्व) अधिकार
तुम्ही मान्य करता व स्विकारता की सेवा व सेवेसंबंधीत आवश्यक म्हणून वापरले जाणारे सॉफ्टवेअर (“सॉफ्टवेअर”) मध्ये काही गोपनीय तसेच स्वामित्वविषयक माहिती आहे/असेल जी लागू असलेल्या बौध्दीक संपत्ती व इतर कायदे यांनी सुरक्षित केलेली आहे. सेवेद्वारे किंवा जाहिरातदाराद्वारे तुम्हाला सादर करण्यात आलेल्या प्रायोजक जाहिराती किंवा माहिती यामधील मजकुरास कॉपीराईट्स, ट्रेडमार्क्स, सर्व्हिस मार्क्स, पेटंट्स किंवा इतर स्वामित्त्व आधिकार आणि कायद्यांनी सुरक्षित केले आहे हे तुम्ही मान्य करता. आमच्या किंवा जाहिरातदाराच्या अधिकृत व अभिव्यक्त संमती शिवाय, सेवा किंवा सॉफ्टवेअरमध्ये किंवा मजकूरात (तुमच्या मालकीच्या मजकुराशिवाय) पूर्ण किंवा त्याचा काही भागात बदल करणे, फेरफार करणे, भाड्याने देणे, लोन, विक्री किंवा वितरण व यावर, आधारित साहित्या तयार करणे असे कोणतेही कृत्य तुम्ही करु शकत नाही, हे तुम्ही मान्य करता.

तुम्ही कोणताही कोड कॉपी करण्याचा, सुधारणा करण्याचा, यावर आधारित साहित्याची निर्मीती करण्याचा, रिव्हर्स इंजिनियर, रिव्हर्स असेंबल (किंवा तृतीय पक्षांना परवानगी देणार नाहीत) किंवा एखादा सोर्स कोड शोधण्याच्या ,तो विकण्याचा, असाईन करण्याचा , त्याचा गैर परवाना काढण्याचा,त्यात कोणतेही अधिकार देण्याचा किंवा सॉफ्टवेअरमधील एखाद्या अधिकाराचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करणार नाही या अटींवर आमच्या सॉफ्टवेरच्या ऑब्जेक्ट कोडचा वापर एकाच संगणकावर करण्यासाठी एक वैयक्तिक, अहस्तान्तरणीय आणि खास नसलेले हक्क आणि परवाने यांचे अनुदान Yahoo तुम्हाला देते. सेवेचा अनधिकृत उपयोग करण्याच्या हेतूने कोणत्याही प्रकारे किंवा स्वरूपात आमच्या सॉफ्टवेअरमधे तुम्ही सुधारणा करणार नाही किंवा सॉफ्टवेअरची सुधारीत आवृत्ती वापरणार नाही हे तुम्ही मान्य करता. Yahoo ची सेवा वापरण्यासाठी देण्यात आलेल्या इंटरफेसशिवाय तुम्ही कोणत्याही इतर प्रकारे Yahoo च्या सेवेचा उपयोग करणार नाही हे तुम्ही मान्य करता.

(१९) वॉरंटीज (हमी) चे अस्वीकरण
तुम्ही स्पष्टपणॆ समजून घेता आणि मान्य करता की:

a. तुम्ही करत असलेला सेवेचा उपयोग किंवा वापर हा पूर्णपणॆ तुमच्या जोखमीवर अवलंबून असेल. ही सेवा "आहे तशी" आणि "जशी उपलब्ध असेल तशी " या अधारावर पुरवली जाते. Yahoo! आणि आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेते, पालक, धारक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपन्या, सहयोगी कंपन्या, एजंट्स आणि कर्मचारी, अभिव्यक्तपणे सर्व हमी, अभिव्यक्त किंवा अंर्तभूत, पूर्णपणे नाकारतात, ज्यात अंतर्भूत उत्पादनांशी संबंधीत व्यापाराच्या हमी, एखाद्या विशिष्ठ उद्देशासाठी योग्यतेची हमी किंवा कशाचेही उल्लंघन न करणारी हमी, ह्यांचा समावेश आहे, पण ह्या करिताच/एवढ्यावरच मर्यादीत नाही.

b. Yahoo आणि आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेते, पालक, धारक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपन्या, सहयोगी कंपन्या, एजंट्स आणि कर्मचारी हे गोष्टींची हमी देत नाहीत

(i) तुमच्या सर्व आवश्यकता ही सेवा पूर्ण करेल,
(ii) ही सेवा, निरंतर, वेळॆत, सुरक्षित, किंवा त्रुटीमुक्त असेल,
(iii) तुम्ही निवडलेला किंवा वापरत असलेल्या चॅनलच्या माध्यमातून ही सेवा तुम्हाला कोणत्याही वेळी किंवा सर्व वेळी वापरता येईल,
(iv) मजकूर किंवा जाहिराती(एकूणच "मटेरीयल्स") सेवेमध्ये, सेवेद्वारे वितरित, किंवा सेवेशी जोडलेली ,सेवेमधून डाऊनलोड किंवा वापरली गेलेली, ही माहिती, किंवा सेवेचा वापर किंवा उपयोग केल्यानंतर मिळणारे परीणाम अचूक किंवा विश्वसनीय असतील.
(v) सेवेद्वारे किंवा सेवेसंबधीत खरेदी केलेली किंवा मिळविलेली कोणतीही उत्पादने, सेवा, माहिती किंवा प्रदर्शित झालेले इतर आईटम यांची गुणवत्ता तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल.
(vi) सॉफ्टवेअरमधील कोणतीही त्रुटी दूर केली जाईल.

c. सेवेच्या उपयोगाद्वारे डाऊनलोड केलेले किंवा अन्य प्रकारे मिळवलेले कोणतेही मटेरीयल तुमच्या विवेक आणि तुमच्या जोखमीवर केलेले असेल आणि अशा मटेरीयमधून डाऊनलोड मुळे झालेल्या तुमच्या संगणकाच्या, मोबाईलच्या किंवा इतर उपकरणांच्या अथवा डेटाच्या कोणत्याही नुकसानासाठी केवळ तुम्ही जबाबदार असाल.

d. कोणत्याही मटेरियलाचा वापर किंवा त्यावर अवलंबून असणे तुमच्या स्वत:च्या विवेकावर किंवा जोखमीवर असेल. सेवेच्या किंवा मटेरीयलच्या कोणत्याही भागातील त्रूटी किंवा चुकांमधे सुधारणा करण्यासाठी किंवा त्या ठीक करण्यासाठी आमच्याकडे, कोणत्याही दायीत्त्वाशिवाय पूर्ण अधिकार आहेत. आमच्याद्वारे आहे-तसे या अधारावर मटेरियल दिले जाते किंवा उपलब्ध करून दिले जाते. ,आणि कोणत्याही मटेरीयलच्या किंवा उत्पादनाच्या किंवा उत्पादनाशी संबंधीत आम्ही व्यापाराच्या आणि विशिष्ठ हेतूसाठी योग्य असण्याच्या कोणत्याही आणि सर्व हमी आम्ही अभिव्यक्तपणे नाकारतो.

e. Yahoo किंवा आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेते, पालक, धारक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपन्या, सहयोगी कंपन्या, एजंट्स आणि कर्मचारी यांच्याद्वारे किंवा सेवेद्वारे तुम्ही प्राप्त केलेली कोणतीही सूचना किंवा माहिती, तोंडी किंवा लेखी असली तरी, कोणत्याही प्रकारची वॉरंटी निर्माण करत नाही जी सेवेच्या अटींमध्ये स्पष्टपणे सांगितलेली नाही.

(२०) दायित्त्वाची मर्यादा
तुम्ही हे स्पष्टपणे जाणता व मान्य करता की, आम्ही आणि आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेते, पालक, धारक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपन्या, सहयोगी कंपन्या, एजंट्स आणि कर्मचारी हे कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रासंगिक, विशिष्ठ,अनावश्यक परिणामी किंवा अनुकरणीय नुकसानास जबाबदार असणार नाही; ज्यात फायद्याच्या तसेच प्रतिमेच्या हानीचे, वापर, डेटा यांचेनुकसान, सद्भावना, किंवा इतर अमूर्त तोटे यांचा समावेश होतो ( आम्ही आणि आमचे परवानाधारक, पुरवठादार, विक्रेते, पालक, धारक, सहायक आणि त्यासंबंधीत कंपन्या, सहयोगी कंपन्या, एजंट्स आणि कर्मचारी , यांना अशा नुकसानांच्या शक्यतेची सूचना दिलेले असली तरी) यांचा समावेश होतो पण हे तेवढ्यापुरते मर्यादित नाही, वरील नुकसान व तोट्यांची कारणे खालील प्रमाणे स्पष्ट केली आहेत:

(i) सेवा, मटेरीयल आणि उत्पादने;
(ii) सेवेचा वापर किंवा वापर करण्याची अक्षमता;
(iii) सेवेद्वारे किंवा सेवेपासून खरेदी केलेला माल, डेटा, माहिती किंवा सेवा किंवा मिळालेले किंवा प्राप्त झालेले संदेश किंवा व्यवहार यांचा परीणाम म्हणून घ्याव्या लागलेल्या बदली वस्तू आणि सेवांचे शुल्क.
(iv) तुमच्या हस्तांतरणाचा किंवा डेटाचा अनधिकृत उपयोग किंवा बदल;
(v) तृतीय पक्षाने सेवेवर केलेली निवेदने व वर्तणूक
(vi) सेवेचा वापर करून पाठवलेल्या वस्तू किंवा सेवा किंवा पाठवलेले किंवा मिळालेले संदेश
(vii) सेवेशी, मटेरीयल्स किंवा उत्पादने यांच्याशी संबंधीत इतर कोणतीही बाब.

(२१) वगळणे व मर्यादा
विभाग १९ आणि २० मध्ये दिलेले हमी अस्वीकार आणि दायित्त्व मर्यादा वगळणे, सर्व संबंधित वास्तवांना लक्षात घेऊन, तुमच्या आणि आमच्या करारातील जोखिम व फायद्यांचे निष्पक्ष व उचित निर्धारण दर्शवतात, हे तुम्ही मान्य करता व यात तुम्ही आम्हाला दिलेल्या मोबदल्याचे मूल्य आणि निर्दिष्ट जोखमींच्या विम्याची उपलब्धता व किंमत यांचा समावेश आहे मात्र हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. यापुढे, हे हमी अस्वीकरण आणि दायित्व मर्यादा लागू असलेल्या कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेत कार्यरत असतील हे तुम्ही मान्य करता.

(२२) आर्थिक बाबींशी संबंध असणाऱ्या सेवांसाठी विशेष सावधानता
जर तुम्हाला कंपनी, स्टॉक्स, निविदा, गुंतवणूक किंवा सिक्युरिटी यांच्या संबंधाने एखादी सेवा,निर्माण करायची असेल किंवा त्यात सामील व्हायचे असेल, किंवा संबंधित माहिती, एखाद्या बातमीची विनंती, संदेश, सूचना किंवा अन्य माहिती हवी असेल तर कृपया विभाग १९ आणि २० पुन्हा वाचा. ते खास तुमच्यासाठी आहेत. या व्यतिरिक्त, खासकरून अशा प्रकारच्या माहितीसाठी, "गुंतवणूकदारांनी सावध रहावे" ही उक्ती उपयुक्त आहे. ही सेवा केवळ माहितीच्या हेतूने पुरवण्यात आली आहे, आणि सेवेवर उपलब्ध असलेला कोणताही मजकूर व्यापार किंवा गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने येथे मांडला नाही. Yahoo आणि त्याचे परवाना धारक हे, सेवेद्वारे हस्तांतरित किंवा उपलब्ध कोणत्याही माहितीची योग्यता, उपयोगीपणा किंवा उपलब्धता यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही, आणि अशा माहितीच्या आधारावर असणाऱ्या कोणत्याही व्यापाराच्या किंवा गुंतवणूकीच्या निर्णयासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाहीत.

(२३) कोणताही तृतीय पक्ष लाभार्थी नाही
या सेवेच्या अटींमध्ये स्पष्टपणे सांगितल्याशिवाय कोणताही तृतीय पक्ष या कराराचा लाभार्थी नाही हे तुम्ही मान्य करता.

(२४) सूचना
सूचना तुम्हाला इमेल किंवा सामान्य मेलद्वारे पाठवल्या जातील. Yahooच्या सेवेच्या अटींमधील किंवा अन्य बाबतीतील होणाऱ्या बदलांची सूचना सेवेद्वारे तुम्हाला सामान्यतः सेवेमध्ये सूचना दर्शवून किंवा सूचनेची लिंक दर्शवून मिळेल. तुम्ही मान्य करता की Yahoo च्या सेवेच्या अटींमधील किंवा अन्य बाबतीतील होणाऱ्या बदलांची सूचना इमेल किंवा सामान्य मेलद्वारे पाठविलेल्या सूचना व सामान्यतः सेवेमध्ये सूचना दर्शवून किंवा सूचनेची लिंक दर्शवून केल्या जातील व अशा प्रकारे तुम्हाला मिळालेल्या सूचना पुरेशा आहेत.

(२५) व्यापारचिन्हांची माहिती
तुम्ही मान्य करता की Yahoo चे ट्रेडमार्क/व्यापारचिन्हे ट्रेडनेम, सर्व्हिस नाव आणि Yahoo लोगो आणि ब्रँन्ड विशेषता आणि उत्पादनांची आणि सेवांची नावे ही Yahoo चे ट्रेडमार्क/व्यापारचिन्हे व मालमत्ता आहे( यामध्ये "Yahoo Marks" चा समावेश आहे. Yahoo च्या पूर्व परवानगी शिवाय तुम्हाला Yahoo Marks कोणत्याही प्रकारे दर्शविता किंवा वापरता येणार नाही असे समजावे.

(२६) कॉपीराईट किंवा बौद्धिक संपत्ति हक्कांचे उल्लंघन गैरवापरासाठी दावा करण्याची सूचना आणि प्रक्रिया
Yahoo इतरांच्या बौद्धिक संपत्ति हक्कांचा आदर करते आणि वापरकर्त्यांनाही हेच करायला सांगते . जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही केलेल्या कामाची कोणीतरी कॉपी करत आहे ज्यात कॉपीराईटचे उल्लंघन होत आहे तर कृपया Yahooच्या कॉपीराइट एजंट/ग्रीव्हन्स ऑफीसरला खालील माहिती कळवा.

• एखाद्या व्यक्तिचे प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक हस्ताक्षर जी व्यक्ती अधीकृतपणे हक्क धारकाच्या वतीने कार्य करु शकते.

• पुनर्मुद्रणाधिकार/कॉपीराइट केलेल्या कामाचे वर्णन ज्याचा स्वामित्त्व अधिकार भंग झाल्याचा तुम्हाला दावा करायचा आहे.

• स्वामित्त्व अधिकार भंग झालेले साहित्य साईटवर कोठे आहे.

• तुमचा पत्ता,दूरध्वनी क्रमांक आणि इमेल पत्ता;

• तुम्ही केलेले विधान की तुम्हाला मान्य आहे की वादग्रस्त/विवादास्पद वापराला स्वामित्त हक्कधारक, त्याचा एजंट किंवा कायदा अधिकृत मानत नाहीत

• शपथेसह तुम्ही केलेले वक्तव्य, की तुम्हाला आढळलेली वरील सूचनेतील माहिती अचूक आहे आणि फक्त तुम्हीच कॉपीराइट हक्कधारक आहात किंवा कॉपीराईट हक्कधारकाच्या वतीने कार्य करू शकता.

Yahoo's च्या कॉपीराईट एजंट्शी स्वामित्त्वहक्कभंगासाठी किंवा बुद्धिमत्ता मालमत्तेच्या उलंघनासाठी या पत्यावर संपर्क साधू शकता

इमेल मार्फत:
Copyright Agent
Yahoo India Pvt Ltd
Unit No. 1261, 6th floor,
Building No.12, Solitaire Corporate Park,
No. 167, Guru Hargovindji Marg,
(Andheri-Ghatkopar Link Road),
Andheri (East), Mumbai - 400 093
India

दूरध्वनी क्रमांक: +९१ २२ ३३०८ ९६००
फॅक्स क्रमांक: +९१ २२ ३३०८ ९७००

(२७) तृतीय पक्षांचे अधिकार
तुम्ही मान्य करता की आमचे लायसन्स धारक, पुरवठाकार, विक्रेते, पालक, धारक, सहाय्यक किंवा संलग्न कंपन्या, अधिकारी, एजंट किंवा कर्मचारी हे जेथे लागू असेल तेथे, विभाग 6, 9, 17, 18 19, 20 चे तृतीयपक्ष लाभार्थी बनण्यास पात्र आहेत. तुम्ही हेही मान्य करता की आमचे कोब्रॅन्डर्स आणि अन्य पक्ष विभाग 9चे तृतीयपक्ष लाभार्थी बनण्यास पात्र आहेत. .तुम्ही मान्य करता की आमचे लायसन्स धारक, पुरवठाकार, विक्रेते, पालक, धारक, सहाय्यक किंवा संलग्न कंपन्या, अधिकारी, एजंट किंवा कर्मचारी आणि आमचे कोब्रॅन्डर्स आणि अन्य पक्ष हे प्रत्येक अनेकदा आणि वैयक्तिकपणे, विभाग 6, 9, 17, 18, 19 व 20 लागू असल्याप्रमाणे वापरू शकतील मात्र याची व्याप्ती निर्दिष्ट मर्यादेपर्यंत किंवा निर्दिष्ट प्रकाराने लागू होईल आणि निर्दिष्ट केल्यापेक्षा पलिकडे किंवा अन्य प्रकारे लागू होणार नाही.

(२७) सामान्य माहिती
संपूर्ण करार. सेवेच्या अटी म्हणजे तुमच्या मध्ये आणि Yahoo मध्ये झालेल्या संपूर्ण कराराचा समावेश आहे आणि ह्या सेवेच्या अटींवर तुमच्या सेवेचा वापर अवलंबून आहे. याआधीच्या तुमच्या व आमच्यामधील कोणतीही समजुत आणि करार आणि कोणत्याही एका पक्षाने दुसऱ्या पक्षाप्रती दिलेली पूर्व विधाने किंवा प्रदर्शने यांना हा करार अवैध करत आहे. . सेवेच्या अटी अशा सहयोगी सेवांना, तृतीय पक्षाचा मजकूर किंवा तृतीय पक्षाच्या सॉफ्टवेअर ला लागू होत नाहीत जे सेवेचा भाग नसतात व जे आमचे लायसन्स धारक, पुरवठाकार, विक्रेते, पालक, धारक, सहाय्यक किंवा संलग्न कंपन्या, किंवा तृतीय पक्षाने तुम्हाला पुरविलेल्या आहेत व ज्या सेवेला इतर तृतीय पक्षाच्या अटी व नियम लागू शकतात. तुम्ही सहयोगी कंपन्यांच्या सेवा, तृतीय पक्ष मजकूर किंवा तृतीय पक्ष सॉफ्टवेअर यांचा वापर करताना तुम्हाला अतिरिक्त शर्ती आणि अटी लागू होण्याची शक्यता आहे.

लागू कायदे आणि अधिकारक्षेत्र. सेवेच्या अटी आणि तुम्ही व Yahoo यांच्यातील संबंध यांच्यावर भारतीय प्रजासत्ताकाच्या कायद्यांचे नियंत्रण असेल जरी त्यातील तरतुदी व भारतीय प्रजासत्ताक कायद्यातील तरतुदींमध्ये विरोध आला तरीही. तुम्ही भारतातील मुम्बई येथील कोर्टाच्या वैयक्तीक व विशेष अधिकारक्षेत्रास आधीन होण्याचे तुम्ही आणि Yahoo मान्य करता.

नियमांची सूट आणि तीव्रता सेवेच्या अटींमधील काही अटी लागू करण्यात किंवा उपयोगात आणण्यास Yahoo असफल झाल्यास अशा हक्कांपासून किंवा अटींपासून सूट गृहित धरू नये. जर योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या कोर्टाद्वारे एखादी सेवेच्या अटीमधील अट अवैध ठरवली गेली असेल तरीही पक्ष मान्य करतात की कोर्टाने येथे प्रस्थापित केलेल्या पक्षांच्या उद्दिष्टाला परिणाम देण्याचा प्रयत्न करावा आणि सेवेच्या अटींमधील अन्य तरतुदी पूर्ण कार्यरत आणि प्रभावी राहतील.

उत्तरजीवीतेचा अधिकार आणि अ-हस्तांतरण

तुमचे Yahoo खाते अहस्तांतरणीय आहे आणि तुमच्या Yahoo आयडी तुमच्या खात्यातील मजकूर यांवरील तुमचा हक्क तुमच्या मृत्यूनंतर संपतो हे तुम्ही मान्य करता. मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रतिच्या प्राप्तीनंतर, तुमचे खाते बंद केले जाईल आणि त्यातील सर्व साहित्य कायमरित्या नष्ट केले जाईल.

मर्यादांचे अधिनियम. देशातील अधिनियम किंवा कायदे विरूध्द असले तरी, सेवेच्या वापरातून किंवा सेवेच्या अटींमधून उद्भवणारा किंवा त्यासंबंधित कोणताही दावा किंवा कृती एका (1) वर्षाच्या आत फाईल केला पाहिजे व त्यानंतर असा दावा किंवा कृती ग्राह्य धरली जाणार नाही.

सेवेच्या अटींमधील विभागांचे शिर्षक हे केवळ सुविधेसाठी आहेत आणि त्यांचे कायदेशीर किंवा कराराचे प्रभाव नाहीत.

(२९) उल्लंघन
सेवेच्या अटींचे उल्लंघन झाल्यास कृपया त्याचा रिपोर्ट आमच्या ग्राहकसेवा समूहाकडे करावा.

  • oath